Posts

Showing posts with the label नावामागे दडलयं काय ??

नावामागे दडलयं काय ?? - " स्वारगेट "

Image
पुण्यात राहून स्वारगेट माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पुण्यातल्या पुण्यात कुठे जायचे असेल किंवा पुण्याबाहेर जायचे असेल तर हे ठिकाण टाळणं अशक्यच.  खर तर  स्वारगेटला पुण्याचे दळणवळणाचे केंद्रस्थान  म्हटले पाहिजे.  जसे हे ठिकाण आज महत्वाचे आहे तसेच ते पूर्वीही महत्वाचे होते. मुख्य गावापासून लांब असणारा हा परिसर होता. सध्याचे स्वारगेट भरवस्तीतच गणले जाते. त्यावेळेस स्वारगेटला काय होते ? हे नाव कसे पडले ? आज बघू "स्वारगेट" या नावामागे दडलयं काय... पुण्यात प्रवेश करण्यासाठीचा एक पर्यायी मार्ग येथून जात असे.  पुण्याची वस्ती वाढत होती, पेठा वसत होत्या. रस्ते बनत होते.  त्यामुळे पूर्वी गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त ठेवली जात असे. त्यासाठी घोडेस्वार तैनात असत. अशा ठिकाणांना नाक्याचे ठिकाण किंवा पहाऱ्याच्या चौक्या म्हणत असत. अशी ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली.  कारण त्या ठिकाणांचे महत्व तसेच राहिले होते.  इंग्रज अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले.  आणि  नाके किंवा चौकी  असे  न राहता ...

''नावामागे दडलंय काय ?'' आता पुस्तकरूपात

Image
माझ पहि लं  पुस्तक  ''नावामागे दडलंय का य  ?''   १ डिसेंबर २०१९ ला प्रकाशित झालं .  त्यानिमित्ताने हा ब्लॉग लिहीत आहे.  आपण सर्वांना माहीतच आहे की पुण्यामध्ये पावलोपावली इतिहास सापडतो. पुण्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांच्या नावात इतिहास, रंजक लोककथा लपून बसल्या आहेत. त्या अजून सर्वांसाठी अपरिचित आहेत. जे पुण्यात दिसत ते सहसा कुठे बघण्यात येत नाही. ऐतिहासिक पुण्याबद्दल जरा वेगळ्या विषयावर माझ्यापरीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी करीत आहे. ''नावामागे दडलंय काय ?''   असे नाव देऊन  मी  पुण्यातल्या वेगवेगळ्या नावांच्या ठिकाणांवर लिहिले. पहिला ब्लॉग मी जिथे राहतो तिथल्या अप्पा बळवंत चौकावर लिहिला. त्याला इतका तुफान प्रतिसाद मिळाला की हा ब्लॉग व्हॉट्सऍप फॉरवर्ड पोस्ट म्हणून खूप फिरला. तिथून पुढे मग मी मागे वळून पाहिलंच नाही. ठिकाणं काही कमी नव्हती. एक एक करीत लिहीत गेलो. संदर्भ शोधायला लागलो. पुढच्याही ब्लॉग्सना चांगला  प्रतिसाद  मिळाला. अनेक जणांनी सांगितले की या ब्लॉग्सचे रूपांतर पुस्तकात करा. पण सुरवातीला मी ते मनावर ...