Posts

गोष्ट पुण्यातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याची

Image
पुण्यात अनेक थोरामोठ्यांचे पुतळे आपल्याला दृष्टीस पडतात. परंतू अशा गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. पुण्यातील काही पुतळे विशेष आहेत. त्यापैकी एक म्हणजे इंग्रजांविरुद्ध "मेरी झांसी नही  दूंगी " असे स्फूर्तिदायक उद्गार काढणाऱ्या झाशीच्या राणीचा पुतळा. तो पुतळा जंगली महाराज उर्फ जे. एम. रोडवर बालगंधर्व रंगमंदिराजवळ आहे. पुतळा जेथे आहे त्या चौकाचे नामकरणही 'झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक' असे केले आहे. आज आपण त्या पुतळ्याबद्दल जाणून घेऊयात.... झाशीची राणी लक्ष्‍मीबाई यांचे पूर्ण नाव 'लक्ष्‍मीबाई गंगाधरराव नेवाळकर' असे होते. मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या या पराक्रमी स्त्रीचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ मध्ये मोरोपंत तांबे व भगिरथीबाई तांबे या मराठी दांपत्याच्या पोटी काशी येथे झाला.  लहानपणीच युद्धशास्त्राचे  प्रशिक्षण तिने घेतले  होते . त्‍यांचा विवाह झाशी संस्थानचे अधिपति गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी १८४२ साली झाला. त्‍यांचे नाव विवाहानंतर लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. तेव्हापासून त्या 'झाशीची राणी' म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या. ब्रिटीशांच्‍या 'ईस्‍ट इंडिया...

क्रिकेटविश्वाचे ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ संग्रहालय

Image
क्रिकेट विश्वचषकाचा माहोल सध्या जगभरात आहे.  क्रिकेट म्हणजे तुम्हा आम्हा भारतीयांचा जीव की प्राण!  अशा  क्रिकेटरसिकांसाठी पुण्यातील सहकारनगरमध्ये एक  अनोखे  संग्रहालय आहे. 'ब्लेड्स ऑफ ग्लोरी' असे  नाव असलेले  हे भारतातले पहिले क्रिकेट संग्रहालय.  क्रिकेटप्रेमी रोहन पाटे यांच्या कल्पकतेतून व अथक परिश्रमाने हा क्रिकेटचा खजिना संग्रहालयाच्या रूपात आपणा सर्वांसाठी निर्माण झाला आहे. ते स्वतः उत्तम क्रिकेटपटू असून  क्रिकेट  क्षेत्रातील ओळखीतून व जपलेल्या संबंधातून हे संग्रहालय उभे राहिले आहे. क्रिकेटच्या प्रेमापोटी त्यांनी देशोदेशी प्रवास केला. २ मे २०१२ मध्ये क्रिकेटचा 'देव' समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या हस्ते उदघाटन झालेल्या या संग्रहालयाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतलेली आहे. जगातील सर्वात मोठ्या या क्रिकेट संगहालयात फक्त भारतातील नव्हे तर जगभरातील नामवंत क्रिकेटपटूंच्या आठवणी येथे वस्तूंच्या रुपात येथे बघायला मिळतात. क्रिकेट या खेळाला सुद्धा स्वतःचा असा इतिहास आहे. चार हजार स्क्व...

नावामागे दडलयं काय ?? - " स्वारगेट "

Image
पुण्यात राहून स्वारगेट माहित नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पुण्यातल्या पुण्यात कुठे जायचे असेल किंवा पुण्याबाहेर जायचे असेल तर हे ठिकाण टाळणं अशक्यच.  खर तर  स्वारगेटला पुण्याचे दळणवळणाचे केंद्रस्थान  म्हटले पाहिजे.  जसे हे ठिकाण आज महत्वाचे आहे तसेच ते पूर्वीही महत्वाचे होते. मुख्य गावापासून लांब असणारा हा परिसर होता. सध्याचे स्वारगेट भरवस्तीतच गणले जाते. त्यावेळेस स्वारगेटला काय होते ? हे नाव कसे पडले ? आज बघू "स्वारगेट" या नावामागे दडलयं काय... पुण्यात प्रवेश करण्यासाठीचा एक पर्यायी मार्ग येथून जात असे.  पुण्याची वस्ती वाढत होती, पेठा वसत होत्या. रस्ते बनत होते.  त्यामुळे पूर्वी गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त ठेवली जात असे. त्यासाठी घोडेस्वार तैनात असत. अशा ठिकाणांना नाक्याचे ठिकाण किंवा पहाऱ्याच्या चौक्या म्हणत असत. अशी ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली.  कारण त्या ठिकाणांचे महत्व तसेच राहिले होते.  इंग्रज अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले.  आणि  नाके किंवा चौकी  असे  न राहता ...

वर्तमानपत्रातील लेख

Image
दैनिक प्रभात मध्ये २१ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेला लेख  दैनिक प्रभात मध्ये १२ सप्टेंबर २०१८ ला प्रकाशित झालेला लेख दैनिक सकाळ मध्ये १५ एप्रिल २०१७ ला प्रकाशित झालेला लेख २९ जानेवारी २०१६ रोजी प्रभात मधील लेख ३० मे २०१८ रोजी दैनिक प्रभात मध्ये प्रकाशित झालेला लेख

राष्ट्रपित्याचे पुण्यातील स्मारक - आगाखान पॅलेस

Image
आगा खान पॅलेस ही वास्तू म्हणजे पुण्यात आलेल्या पर्यटकांसाठी आकर्षित करणारी वास्तू. वास्तुशास्त्रदृष्ट्या सुंदर शुभ्र पांढरी इमारत, आसपासची बागबगीच्यातून राखलेली हिरवळ आणि लाभलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली वास्तू. इ.स. १९४२ साली भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक मानाचं स्थान या वास्तूला लाभलंय. १९ व्या शतकाच्या मध्यात पहिले आगाखान सुरतमार्गे भारतात आले. पश्चिम आशियातील उदार व्यापारी घराणं असा त्यांचा नावलौकिक होता. दुसरे आगाखान १८८५ साली मुंबईत वारले. या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह आगाखान (तिसरे)(जन्म-१८७७ व मृत्यू १९५७) यांनी इ.स. १८९२ मध्ये केली. ते शिया इस्मायली संप्रदायाचे ४८ वे इमाम होते. 'ऑल इंडिया मुस्लिम लिग' उभी करण्यात ज्यांचा हातभार होता, त्यांच्यापैकी ते एक होते. या संघटनेचे ते पहिले अध्यक्षही होते. ते इंग्रजांच्या काळात एक बडं प्रस्थ होते. १९३० सालच्या गोलमेज परिषदेला त्यांनी उपस्थिती लावली होती. आगाखान पॅलेस दुष्काळ पडला असताना ही वास्तू उभी राहिली होती. लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी हा महाल बांधला, असे कळते. जवळपास १००० जणांना रोजगार य...

''नावामागे दडलंय काय ?'' आता पुस्तकरूपात

Image
माझ पहि लं  पुस्तक  ''नावामागे दडलंय का य  ?''   १ डिसेंबर २०१९ ला प्रकाशित झालं .  त्यानिमित्ताने हा ब्लॉग लिहीत आहे.  आपण सर्वांना माहीतच आहे की पुण्यामध्ये पावलोपावली इतिहास सापडतो. पुण्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांच्या नावात इतिहास, रंजक लोककथा लपून बसल्या आहेत. त्या अजून सर्वांसाठी अपरिचित आहेत. जे पुण्यात दिसत ते सहसा कुठे बघण्यात येत नाही. ऐतिहासिक पुण्याबद्दल जरा वेगळ्या विषयावर माझ्यापरीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी करीत आहे. ''नावामागे दडलंय काय ?''   असे नाव देऊन  मी  पुण्यातल्या वेगवेगळ्या नावांच्या ठिकाणांवर लिहिले. पहिला ब्लॉग मी जिथे राहतो तिथल्या अप्पा बळवंत चौकावर लिहिला. त्याला इतका तुफान प्रतिसाद मिळाला की हा ब्लॉग व्हॉट्सऍप फॉरवर्ड पोस्ट म्हणून खूप फिरला. तिथून पुढे मग मी मागे वळून पाहिलंच नाही. ठिकाणं काही कमी नव्हती. एक एक करीत लिहीत गेलो. संदर्भ शोधायला लागलो. पुढच्याही ब्लॉग्सना चांगला  प्रतिसाद  मिळाला. अनेक जणांनी सांगितले की या ब्लॉग्सचे रूपांतर पुस्तकात करा. पण सुरवातीला मी ते मनावर ...

पुणे महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचा इतिहास

Image
कै. मा. गणपतराव महादेव नलावडे हे पुणे महानगरपालिकेचे १९५३-५४ मध्ये महापौर होते. ते सावरकरवादी म्हणून ओळखले जात. नलावडे यांच्या कारकिर्दीत सावरकरांनी त्यांना महापौर झाल्याबद्दल अभिनंदनपर पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी 'मेयर' या इंग्रजी शब्दास "महापौर" शब्द सुचविला होता. त्याप्रमाणे त्यांनी तो कार्यालय फलकावर लिहिला. आणि नंतरच्या काळात तो वापरात आला. नलावडे यांच्या काळात पुणे महानगरपालिकेचा ध्वज आणि बोधचिन्ह ठरविण्यासाठी समिती नेमली गेली. त्या समितीचे अध्यक्ष नलावडे हेच होते. ध्वजाचा रंग केशरी ठरविला. ज्या छत्रपती शिवरायांनी पुण्यभूमीत सोन्याचा नांगर चालविला म्हणून त्यांचे अश्वारूढ चित्र आपल्याला दिसते. तसेच थोरले बाजीराव पेशव्यांनी पुण्यात शनिवारवाडा बांधला त्या वास्तूचा महानगरपालिकेच्या बोधचिन्हात समावेश आहे. पुणे म.न.पा.चे बोधचिन्ह अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेचे बोधवाक्य. "वरं जनहितं ध्येयम" हे वाक्य जे दिसते ते सावरकर यांनी लिहिलेल्या ओळी आहेत. हे बोधवाक्य समितीने आणि म. न. पा. च्या मुख्य सभेने एकमताने मान्यता दिली होती.  ए...