Saturday, October 26, 2019

पुणे महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचा इतिहास

कै. मा. गणपतराव महादेव नलावडे हे पुणे महानगरपालिकेचे १९५३-५४ मध्ये महापौर होते. ते सावरकरवादी म्हणून ओळखले जात. नलावडे यांच्या कारकिर्दीत सावरकरांनी त्यांना महापौर झाल्याबद्दल अभिनंदनपर पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी 'मेयर' या इंग्रजी शब्दास "महापौर" शब्द सुचविला होता. त्याप्रमाणे त्यांनी तो कार्यालय फलकावर लिहिला. आणि नंतरच्या काळात तो वापरात आला. नलावडे यांच्या काळात पुणे महानगरपालिकेचा ध्वज आणि बोधचिन्ह ठरविण्यासाठी समिती नेमली गेली. त्या समितीचे अध्यक्ष नलावडे हेच होते. ध्वजाचा रंग केशरी ठरविला.

ज्या छत्रपती शिवरायांनी पुण्यभूमीत सोन्याचा नांगर चालविला म्हणून त्यांचे अश्वारूढ चित्र आपल्याला दिसते. तसेच थोरले बाजीराव पेशव्यांनी पुण्यात शनिवारवाडा बांधला त्या वास्तूचा महानगरपालिकेच्या बोधचिन्हात समावेश आहे.

पुणे म.न.पा.चे बोधचिन्ह

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेचे बोधवाक्य. "वरं जनहितं ध्येयम" हे वाक्य जे दिसते ते सावरकर यांनी लिहिलेल्या ओळी आहेत. हे बोधवाक्य समितीने आणि म. न. पा. च्या मुख्य सभेने एकमताने मान्यता दिली होती. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या तिघांचा या शहरास पदस्पर्श झाला त्यांचा हा सन्मानच आहे.
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक


-------------------------------------------------------------------------------

4 comments:

  1. स्वातंत्र्य वीर सावरकरांनी मराठी ला अनेक नवीन शब्द दिले आहेत त्या पैकी एक महापौर

    ReplyDelete