Friday, December 20, 2019

''नावामागे दडलंय काय ?'' आता पुस्तकरूपात

माझ पहिलं पुस्तक ''नावामागे दडलंय का ?'' १ डिसेंबर २०१९ ला प्रकाशित झालंत्यानिमित्ताने हा ब्लॉग लिहीत आहे. 

आपण सर्वांना माहीतच आहे की पुण्यामध्ये पावलोपावली इतिहास सापडतो. पुण्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांच्या नावात इतिहास, रंजक लोककथा लपून बसल्या आहेत. त्या अजून सर्वांसाठी अपरिचित आहेत. जे पुण्यात दिसत ते सहसा कुठे बघण्यात येत नाही. ऐतिहासिक पुण्याबद्दल जरा वेगळ्या विषयावर माझ्यापरीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी करीत आहे.

''नावामागे दडलंय काय ?'' असे नाव देऊन मी पुण्यातल्या वेगवेगळ्या नावांच्या ठिकाणांवर लिहिले. पहिला ब्लॉग मी जिथे राहतो तिथल्या अप्पा बळवंत चौकावर लिहिला. त्याला इतका तुफान प्रतिसाद मिळाला की हा ब्लॉग व्हॉट्सऍप फॉरवर्ड पोस्ट म्हणून खूप फिरला. तिथून पुढे मग मी मागे वळून पाहिलंच नाही. ठिकाणं काही कमी नव्हती. एक एक करीत लिहीत गेलो. संदर्भ शोधायला लागलो. पुढच्याही ब्लॉग्सना चांगला प्रतिसाद मिळाला.

अनेक जणांनी सांगितले की या ब्लॉग्सचे रूपांतर पुस्तकात करा. पण सुरवातीला मी ते मनावर घेतलं नव्हतं. ब्लॉग्सवर खूप चांगले अभिप्राय मिळायला लागले. तुम्ही अमुक एक ठिकाणावर लिहा आम्हाला वाचायला आवडेल, अशा प्रतिक्रिया मिळायला लागल्या. त्यामुळे मला लिहायला खूप प्रोत्साहन मिळाले. नंतर मला वाटले की पुस्तकरुपी ही माहिती आली तर ते बरं होईल. म्हणून त्या दृष्टीने मी तयारी सुरु केली. ब्लॉग्समध्ये अजून माहिती टाकून त्यात सुधारणा केली. नवनवीन ठिकाणांचा शोध घ्यायला लागलो. त्याची माहिती मिळवायला लागलो. पुण्यातील नवी-जुनी ठिकाणं या पुस्तकात समाविष्ट केली आहेत. सांगायला आनंद होतोय की पुस्तकातील काही ठिकाणांबद्दल इतरत्र फारसे वाचावयास मिळणार नाही.



ज्येष्ठ सूत्रसंचालक आणि मुलाखतकार माननीय सुधीर गाडगीळ सर यांची पुस्तकाला प्रस्तावना मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच सकाळ वृत्तपत्राचे संपादकीय सल्लागार मल्हार अरणकल्ले यांनी पुस्तकास अभिप्राय दिला आहेमला ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले ते इतिहास तज्ज्ञ महेश तेंडुलकर सर प्रकाशनास उपस्थित होते.

पुस्तकातील ठिकाणांची माहिती देताना योग्य संदर्भ देण्याचा प्रयत्न मी केला आहे. परंतु काही ठिकाणांची नावे आख्यायिकांवरून पडलेली आहेत. त्यांना ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. शिवाय काही माहिती मी त्या त्या ठिकाणच्या संबंधित लोकांशी संपर्क करून घेतलेली आहे. त्यामुळे काही उणीव जाणवल्यास मला नक्की कळवावे. त्यामध्ये सुधारणा दुसऱ्या आवृत्तीत नक्की करेन. पुण्यावरच्या प्रेमातून एका सामान्य पुणेकराने कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाची अनुक्रमणिका

पुस्तकाची अनुक्रमणिका

-------------------------------------------------------------------------------
पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा टिळक रस्ता, बुकगंगा डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

फ्लिपकार्टवर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c
-------------------------------------------------------------------------------
© सुप्रसाद पुराणिक

No comments:

Post a Comment