फरीद शेख कॅमेरा संग्रहालय

सध्या आपण डिजिटल युगात सगळेच फोटोग्राफी करतो. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अगदी मोबाइलमध्ये सुद्धा आपण उत्तम छायाचित्रे टिपू शकतो. पण पूर्वीचे कॅमेरे कसे होते ? त्यांचे प्रकार कोणते ? तंत्रज्ञान कसं होतं ? हे तुम्हाला जाणून घ्यायचंय... तर मग तुम्ही या संग्रहालयाला भेट नक्कीच दिली पाहिजे. संपूर्ण भारतात नसावं, असं पुण्यात कोंढवा बुद्रुकमधे एक कॅमेरा संग्रहालय आहे. हा कॅमेरा संग्रहाचा छंद जोपासलाय तो '' फरीद शेख '' यांनी. 

इ.स. १९६८ मध्ये ते १२ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना एक फोल्डिंग कॅमेरा दिला. काही चांगली छायाचित्र काढल्यानंतर वडिलांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना फोटोग्राफीमध्ये प्रशिक्षण दिले. त्यांचे वडील छायाचित्रकार होते. ते प्रसिद्ध ''रॉयल फोटो स्टुडिओ'' चालवत होते. वडील गेल्यानंतर त्यांनी हा स्टुडिओ चालवायला घेतला. त्यानंतर त्यांनी कॅमेरा बद्दलची माहिती व कॅमेरा संग्रह वाढविण्यास सुरवात केली.

फरीद शेख  (Source - Google) 
संग्रहालयाच्या इमारतीत शिरल्यावर आपल्याला समोरच एक जुन्या काळात चित्रपटात वापरला जाणारा ३५ MM चा प्रोजेक्टर दिसतो. इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आपल्याला हा कॅमेरा संग्रह पाहायला मिळतो. मोठ्या कष्टाने त्यांनी देशोदेशातून हा संग्रह जमा केला आहे. त्यांच्याकडे ३००० पेक्षा जास्त कॅमेरे सद्यस्थितीस आहेत. यात रोलीफ्लेक्स, कोडॅक, यशिका, निकॉन अशा अनेक कंपन्यांचे येथे छोटे-मोठे कॅमेरे बघायला मिळतात. त्यांच्या संग्रहात एकोणिसाव्या शतकापासूनचे कॅमेरे बघायला मिळतात.

संग्रहातील विविध कॅमेरा (Source - Google) 

बंदुकीच्या आकाराचा कॅमेरा  (१९२०)
भारतीय सिनेसृष्टीचा पहिला चित्रपट होता, '' राजा हरिश्चंद्र '' ! हा चित्रपट बनविण्यासाठी जो कॅमेरा वापरला, तो इथे बघायला मिळतो. संग्रहालयात अँनलायझरचा व व्हिडिओग्राफीच्या कॅमेरांचा स्वतंत्र विभाग आहेत. इथले काही कॅमेरे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मिनिएचर कॅमेरा ( १८८५ ), सिंगल लेन्स, ट्वीन लेन्स, सेल्फ टाइमर कॅमेरा (१९४५), स्टॅम्प कॅमेरा (१९१०), वेस्ट पॉकेट कॅमेरा (१९१४) असे अनेक प्रकारचे कॅमेरे आणि रोल्स , फ्लॅश अशा निरनिराळ्या कॅमेरासंबंधी गोष्टी पाहायला मिळतात. दुसऱ्या महायुद्धात वापरलेला स्पाय कॅमेरा (१९३८) पाहायला मिळतो. एक कॅमेरा तर बंदुकीच्या रूपात पाहायला मिळतो. सुरवातीला आहे तसाच अजून एक प्रोजेक्टर तिसऱ्या मजल्यावर आपल्याला पाहायला मिळतो. हा कॅमेरांचा संग्रह फरीद शेख यांचे चिरंजीव झाकीर आपल्याला समजावून सांगतात.

संग्रहालयात अँनलायझरचा व व्हिडिओग्राफीच्या कॅमेरांचा स्वतंत्र विभाग आहेत. येथील काही कॅमेरांच्या किंमती तर लाखात आहेत. एकदा ते सिंगापूरच्या टूरवर असताना त्यांनी एक कॅमेरा विकत घेतला. तेव्हा त्यांनी होते ते सगळे पैसे गुंतविले. त्यांच्या कडे त्यावेळेस काही खायला पैसे उरले नव्हते. ते आणि त्यांची बायको २ दिवस भुकेले राहिले होते. सुदैवाने त्यांची परतीची विमान तिकिटे आधीच काढलेली होती. येथील प्रत्येक कॅमेराला स्वतःची एक कथा आहे. इथले काही कॅमेरा कसे मिळविले , यांबद्दल अनेक किस्से फरीद शेख यांच्याकडून ऐकायला मिळतात. 'मी भाग्यवान होतो की बायकोने माझ्या या आवडीला मला पाठिंबा दिला', असे ते सांगतात. अपार मेहनतीतून, समर्पणातून साकारलेल्या या संग्रहालयाला एकदा जरूर भेट द्या. छायाचित्रकारांसाठी तर हे संग्रहालय पर्वणीच ठरेल. 

इतर उपकरणे

                
              इतर उपकरणे
इतर उपकरणे

-------------------------------------------------------------------------------
पत्ता - फरीद मंझिल , कोंढवा बुद्रुक , पुणे , महाराष्ट्र ४११०४८
फोन नंबर - ९३७१२६८२९०
तिकीट - निशुल्क
टीप:- संग्रहालय पाहण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते.
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

---------------------------------------------------------------------------------
©  सुप्रसाद पुराणिक

19 comments:

  1. वा! फार छान माहिती. असं आगळंवेगळं संग्रहालय पाहायला नक्कीच आवडेल.पत्त्यासाठी आभार.

    ReplyDelete
    Replies
    1. Nakki paha sangrahalay. Comment baddal abhari ahe.

      Delete
  2. छान माहिती धन्यवाद

    ReplyDelete
  3. तुझे सर्व लेख खुप माहिती पूर्ण असतात. तुझे आभार तुझ्यामुळे आम्हाला ही माहिती मिळते

    ReplyDelete
  4. Grate news will be visiting this place on my next visit to Pune

    ReplyDelete
  5. अप्रतिम संग्रहालय.... नक्कीच पहायला जाणार...!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. नक्की पहा संग्रहालय 😊

      Delete
  6. छान माहिती संग्रहालय बघालाय आवडेल

    ReplyDelete
  7. Wow! great collection of camera

    ReplyDelete
  8. अतिशय महत्वाची माहिती. आणि वेगवेगळे कॅमेरे पहायला मिळाले.

    ReplyDelete

INSTAGRAM FEED

@suprasadp