डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक

पुण्यात भेट देण्यायोग्य अनेक पर्यटनस्थळे आहेतत्यात संग्रहालयांचा समावेश दुर्दैवाने अत्यल्प प्रमाणात होतो. गरज आहे ती स्मारके डोळसपणे बघून आपला वारसा, संस्कृती व इतिहास समजून घेण्याची. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर असेच एक संग्रहालय स्मारक आहे. ते म्हणजे सिम्बॉयसिस सोसायटीचे ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारक''. या महापुरुषाचे कर्तृत्व जीवनप्रवास येथे बघायला मिळतो. २६ नोव्हेंबर १९९६ (त्या दिवशी १९४९ साली बाबासाहेबांनी भारतीय संविधान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्त केले होते.) रोजी या स्मारकाचे उदघाटन उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते झाले. ''डॉ. भीमराव रामजी आंबेडकर'' (१४ एप्रिल १८९१–६ डिसेंबर १९५६) म्हणजेच 'बाबासाहेब आंबेडकर' यांना आपण ''भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार'' म्हणून ओळखतो. भारताची राज्यघटना म्हणजे त्यांच्या कार्याची कुशाग्र बुद्धिमत्तेची प्रचितीच. याशिवाय बाबासाहेब आंबेडकर ग्रंथकार, वक्ते, प्राध्यापक, कायदेपंडित म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते.

संग्रहालयाची वास्तू (स्तूपासारखी)

बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय

संग्रहालयाची वास्तू बुद्ध वास्तुकलेच्या शैलीतील स्तूपाच्या आकाराची आहे. बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकरांनी या संग्रहालयासाठी हातभार लावला. बाबासाहेबांच्या दैंनदिन वापरातल्या वस्तू त्यांनी या स्मारकासाठी स्वाधीन केल्या. इथे बाबासाहेबांची जुनी छायाचित्रे असून त्यांची माहिती पण वाचायला मिळतेसंग्रहालयाच्या मार्गावर बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना देखावे, चित्र व माहितीफलकाच्या माध्यमातून पाहावयास मिळतात. तसेच तेथे नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन व मार्टिन ल्युथर किंग यांची छायाचित्र व माहितीफलक लावले आहेत. 

वस्तूंच्या संग्रहात बाबासाहेबांच्या संसारातील अनेक गोष्टी दिसतात. त्यात जेवणाची भांडी, डबे, ब्रिटिशपद्धतीच्या चहाच्या किटल्या, दाढीचे सामान, जोडे यांचा समावेश होतोबाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील पत्रे  देखील येथे पहायला मिळतात. याशिवाय त्यांच्या आरामखुर्च्याचांदीची फ्रेम असलेला चष्मा, बाबासाहेबांचे नाव असलेले रबरी शिक्के, त्यांची सोबती हातातली काठी, बॅगा, प्रवास साहित्य, जेवणाचे टेबल, पोशाख सुद्धा येथे आहेतत्यांनी लिहिलेले ग्रंथ येथे मांडून ठेवलेले आहेत. ज्या खुर्चीत बसून त्यांनी भारतीय राज्यघटनेची अनेक प्रकरणे लिहिली ती खुर्चीदेखील येथे बघायला मिळते. अगदी त्यांनी शेवटचा श्वास जिथे घेतला तो बिछाना, रजई, पलंग  घड्याळ जतन करण्यात आला आहेत्यांचे पवित्र अस्थिकलश व चिरनिद्रा घेतलेले छायाचित्रसुद्धा येथे ठेवले आहे.

बाबासाहेबांनी अखेरचा श्वास जेथे घेतला तो पलंग

बाबासाहेबांच्या वापरातले टेबल व खुर्ची 

बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तू

बाबासाहेबांना संगीताची आवड होती. त्यांची एक व्हायोलिन येथे पाहायला मिळते. बाबासाहेबांच्या नित्यपुजेतील गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा इथे संग्रहित आहेबाबासाहेबांना उघड्या डोळ्याची बुद्धमूर्ती आवडे, ही तशीच आहे. ओस्मानिया विद्यापिठाची त्यांना मिळालेली डॉक्टरेट पदवी बघायला मिळते. त्यांचे छायाचित्र असलेली नाणी, स्टॅम्प रबरी शिक्के पाहायला मिळतात. बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी केलेला महाड येथील चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेशासाठीचा सत्याग्रह, पुणे करार अशा अनेक महत्वाच्या घटना प्रदर्शित केल्या आहेत. १९९० साली बाबासाहेबांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देण्यात आला. त्या पुरस्काराचे पदक मानपत्र येथे ठेवण्यात आले आहेभगवान गौतम बुद्धाला ज्या बोधी वृक्षाखाली आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला, त्या बोधी वृक्षाचे छोटे रोपटे माईसाहेब आंबेडकर यांनी येथे लावले होते. आज त्या रोपट्याचे महाकाय वृक्षात रूपांतर झाले आहे.

संग्रहालयातील माहितीफलक

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळातले देशाचे पहिले कायदेमंत्री बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केल्याचे समजतेबाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथे २०१५ साली 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी'चे उदघाटन झाले. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल २०१७ पासून पुढे ''ज्ञान दिवस'' म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे. गेल्या अनेक दशकांपासून लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. सिम्बॉयसिस संस्थेच्या आवारातल्या या संग्रहालयाचा परिसर टेकडीच्या पायथ्याला असून हिरवाईने राखला गेला आहे. जातीभेद नष्ट करू पाहणाऱ्या, कनिष्ठ वर्गाच्या हक्कासाठी झटणाऱ्या व देशासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या या भारताच्या महापुरुषाचे हे स्मारक एकदा आवर्जून बघावे.

बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाची निवडक छायाचित्रे  
( सर्व छायाचित्रे www.symbiosis-ambedkarmemorial.org या वेबसाईट वरून )
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) पुणे शहराचा ज्ञानकोश - डॉ. शां. ग. महाजन 
-------------------------------------------------------------------------------
वेळ.३० ते ५.३०
पत्तासिम्बॉयसिस संस्था, सेनापती बापट रस्ता, पुणे , महाराष्ट्र  ४११०१६
फोन नंबर - ०२०-२५६५ ९९०९
तिकीट - १० रुपये 
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c

---------------------------------------------------------------------------------

4 comments:

  1. Very very nice sups, keep it up bro....you always analyse, observe and wrote wonderfully.....great job bro....the information you are sharing is very vital....we are proud of you bro.....

    ReplyDelete

INSTAGRAM FEED

@suprasadp