शनिवारवाड्याच्या जागेबाबतची आख्यायिका...

पुण्याच्या इतिहासातील एक 'सोनेरी पान' म्हणजे शनिवारवाडा. येथूनच अवघ्या मराठा साम्राज्याचा कारभार पहिला जात असे. या वास्तूची १० जानेवारी १७३२ ला पायाभरणी व २२ जानेवारी १७३४ रोजी वास्तुशांत पार पडली, या दोन्ही तारखांना शनिवार होता म्हणून नाव पडले 'शनिवार वाडा'.



बाजीरावांनी सुरवातीची काही वर्षे सासवड येथून कारभार चालविला होता. पुण्यात यायचं असं ठरविल्यानंतर थोरले बाजीराव पेशवे काही वर्षे पुण्यातील धडपळ्यांच्या वाड्यात राहिले होते. ''पुणियात राहावे लागते या करिता राहते घर व सदर व सोपा कारकुनास घर कोटात तयार करणे,'' अशी आज्ञा त्या वेळचा पुण्याचा अधिकारी बापूजी श्रीपत यास पत्र पाठवून केली होती. थोरल्या बाजीरावांनी शनिवारवाडा बांधण्याची जागा निवडली होती. ही जागा कशी निवडली गेली, त्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.

''आपला वाडा कुठे बांधायचा याची पाहणी सुरु असताना बाजीरावांना घोड्यावरून जात असताना एक विलक्षण परंतु विचित्र द्रुष्य नजरेस पडले. एक ससा कुत्र्याचा पाठलाग करतो आहे असे ते द्रुष्य होते. तेव्हा या जागेत काहीतरी शुभ गुण असला पाहिजे, असा विचार करून बाजीरावांनी शनिवारवाड्याची जागा निश्चित केली.''
---------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) पुण्याचे पेशवे - अ. रा. कुलकर्णी
२) शनिवारवाडा - डॉ. ग. ह. खरे
---------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c
-------------------------------------------------------------------------------
© सुप्रसाद पुराणिक

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp